गुगलच्या या ३ प्रायव्हसी सेटिंग्ज, तुमचा फोन सुरक्षित ठेवतील
गुगलवर सुरक्षा असणे खूप महत्वाचे आहे.
आजकाल प्रत्येकजण गुगल वापरतो. मग ते काहीतरी शोधणे असो, खरेदी करत असो किंवा इतर कोणतेही काम असो. सर्व काही गुगल द्वारे केले जाते.
गुगलवर सुरक्षा असणे खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही गोपनीयता सेटिंग्ज सुरु करत नाही तोपर्यंत तुमचा डेटा चोरीला जाण्याचा धोका असतो.
गुगल तुमचे ठिकाण नेहमीच ट्रॅक करत असते. हे बंद करण्यासाठी तुम्हाला Settings > Google > Location > Location History > Off तुम्हाला ऑफ वर क्लिक करावे लागेल. हे तुमचे ठिकाण सेव्ह करणार नाही.
गुगल तुमच्या ब्राउझिंग आणि अॅप वापराबद्दल माहिती सेव्ह करते.ते बंद करण्यासाठी: myactivity.google.com > Web & App Activity > Pause करा. हे तुमच्या ऑनलाइन एक्टिव्हीटी सुरक्षित ठेवेल.
जाहिराती बंद करण्यासाठीSettings > Google > Ads > Opt out of Ads Personalization वर क्लिक करा.
नेहमी स्ट्रॉग पासवर्ड ठेवा किंवा फिंगरप्रिंट ठेवा. माहित नसलेले अॅप्स डाऊनलोड करु नका.
गुगल खात्यावर टू स्टेप व्हेरिफिकेशन अॅक्टिव्हेट करा. नेहमी अॅप आणि सेटींग तपासत रहा.