सुमुख यातून त्याचे मुख सुंदर असून ते इंद्रियांमध्ये मुख्य आहे.
एकदंत एकात्मता (एकपणा) दाखवणारा आणि दुजा भाव न ठेवणारा असा.
कपिल कपि अर्थात वानररूप. चंचल मनाला नियंत्रण करणारा.
गजकर्ण गुपित गोष्टीही समजून घेणारा.
लंबोदर आपल्या उदरात सर्वांना सामावून घेणारा.
विकट शक्ती, बुद्धी आणि गुण यांनी प्रचंड असणारा, तसेच त्याच्यापुढे सर्वच जण नतमस्तक होतात असा.
विघ्नविनाशक भक्तांच्या संकटांचा नाश करणारा.
गणाधिप योग्य नायक. नेतृत्व करणारा.
धुम्रकेतू सर्व धूसर भ्रम, कल्पना आणि संशय नष्ट करणारा.
गणाध्यक्ष सर्व इंद्रियांचा आणि देवांचा प्रमुख असणारा.
भालचंद्र मस्तकावर चंद्र धारण करणारा, म्हणजेच ज्याचे मस्तक शांत आणि थंड आहे असा.
गजानन ज्याचे मस्तक हत्तीचे आहे, म्हणजेच हत्तीसारखा शांत, सूक्ष्म आणि दूरदृष्टी असणारा.