तमन्ना भाटियासारखा लूक देणारा फेसमास्क

अनेक तरूणींना अभिनेत्री तमन्ना भाटियासारखा लूक हवा असतो.

तमन्ना भाटियानं एका मुलाखतीत सांगितलं की, 'कधी कधी ब्यूटी सीक्रेट्स आपल्या किचनमध्येच असतात. आजही आईने दिलेल्या टिप्स फॉलो करते'.

तमन्नासारखी सतेज, मुलायम त्वचा आपल्याला सुद्धा हवी असेल तर तिच्या ब्यूटी सीक्रेट्स फॉलो करू शकता.

तमन्ना घरीच एक्सफोलिएटींग फेस मास्क बनवते. ज्यानं डेड स्किन दूर होते. सोबतच स्किन मुलायम आणि फ्रेश दिसते.

हे खास फेस मास्क तयार करण्यासाठी एक चमचा चंदन पावडर, कॉफी पावडर आणि एक चमचा मध टाकून मिक्स करा. 

ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हातानं मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा. 

तसेच मॉइश्चरायजिंग फेस मास्क बनवण्यासाठी गुलाबजल, बेसन आणि थंड दही मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला थंडावा देते. हा मास्क चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. 

जर आपल्या तमन्ना भाटियासारखी त्वचा हवी असेल तर हे दोन फेस मास्क लावू शकता.

Click Here