लिव्हर डॅमेज होत असल्याचे २ मुख्य संकेत

आजकाल फॅटी लिव्हर कॉमन समस्या झालीये. या स्थितीत लिव्हरवर जास्त फॅट जमा होतं.

लिव्हरवर फॅट वाढल्यास लठ्ठपणा, टाइप - २ डायबिटीस आणि मेटाबॉलिक सिंड्रोमसारखे आजार होतात.

बरेच दिवस कळून येत नाही की, फॅटी लिव्हरची समस्या झालीये. जर फॅटी लिव्हर असेल तर दोन संकेत मिळतात.

थकवा फॅटी लिव्हरचं सगळ्यात कॉमन लक्षण आहे. लिव्हर फॅटी असेल तर आराम केल्यावरही जास्त थकवा जाणवतो.

लिव्हरवर फॅट जमा झाल्यावर त्यावर सूज येते आणि त्याचं काम कमी होतं. त्यामुळे एनर्जी सुद्धा कमी होते, थकवा जाणवतो.

फॅटी लिव्हरचा आणखी एक मुख्य संकेत म्हणजे पोटाच्या उजव्या बाजूला छातीच्या खाली वेदना होतात. तिथेच लिव्हर असतं.

लिव्हरमध्ये स्वत: वेदना सांगणाऱ्या नसा नसतात. पण ते ग्लिसन कॅप्सूल नावाच्या एका थरानं झाकलेलं असतं. ज्यात पेन रिसेप्टर्स असतात.

जेव्हा लिव्हर फॅटमुळे मोठं होतं किंवा त्यात सूज येते, तेव्हा ही कॅप्सूल पसरते. पोटात वरच्या भागात वेदना होतात.

Click Here