छोटा पॅकेट, बडा धमाका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. सध्याच्या घडीला तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून शिवाली परब प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करते आहे. विशेष म्हणजे उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे आज ती अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.
शिवाली परबचा सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
या सिल्व्हर रंगाच्या साडीवर तिने पिवळ्या रंगाचा लांब हाताचा ब्लाउज परिधान केलाय आणि केस मोकळे सोडलेत. कपाळावर छोटी टिकली लावलीय. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
शिवाली परबच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे. फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.