अभिनेत्री प्राप्ती रेडकरला सावलीच्या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळालीय.
'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
सावलीचा सोज्वळ, साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव सर्वांना भावला. या मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकरने निभावली आहे.
प्राप्ती रेडकर सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने ग्लॅमरस फोटोशूट केलंय.
प्राप्ती रेडकरच्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.