रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं भावाला राखी बांधण्याची प्रथा आहे
छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे राहणाऱ्या स्वपनचा रक्षाबंधनाचा दिवस खूप खास आणि अनोखा असतो
स्वपनला कुणीही सखा भाऊ नाही, मात्र तिला लहानपणापासून प्राण्यांची आवड आहे.
लॉकडाऊन काळात स्वपनकडे एक पोपट आला, ज्याचे नाव हिर ठेवण्यात आले आहे. याआधी ती सशाला राखी बांधत होती
हिर आल्यापासून स्वपनने त्याला भाऊ मानत सोन्याची राखी बांधायला सुरू केले. माणसांपेक्षा प्राणी-पक्षी प्रामाणिक असतात असं ती म्हणते
हिर प्रत्येकवेळी स्वपनसोबत राहतो. मग ती दुचाकीवर असेल किंवा फिरायला गेली असेल. हिरला ती कायम स्वत:सोबत ठेवते.
स्वपन हिरसोबत केवळ रक्षाबंधनच नाही तर त्याचा वाढदिवस, नवरात्री, दिवाळीसारखे सणही आवडीने साजरा करते.
नवरात्रीला हिरच्या नावाने ती भंडारा आयोजित करते, हिर केवळ पक्षी नसून माझ्या आयुष्याचा भाग आहे असं ती म्हणते