स्क्रीन टाईम वाढतोय, करा 'हे' भन्नाट उपाय
धक्कादायक म्हणजे याचा परिणाम त्यांचा मूड, झोप आणि भाषेच्या विकासावर 

स्क्रीन टाईम किती असावा? 
 २-५ वयोगटातील मुलांचा स्क्रीन टाईम दिवसातून १ तासापेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे 

विलंबित भाषा कौशल्ये 
स्क्रीन टाईम वाढल्यास, वास्तविक जगातील संभाषणे कमी होतात, शब्दसंग्रह आणि भाषण विकास मंदावतो

चिडचिडेपणा आणि राग 
 स्क्रीन टाइम संपल्यावर मुले जास्त चिडचिडी किंवा निराश होऊ शकतात, ज्यामुळे सतत मूड स्विंग आणि स्वभावात आक्रमकता येते.

झोपेत व्यत्यय 
स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम करतो, ज्यामुळे लहान मुलांना झोप येणे आणि गाढ झोप लागणे कठीण होते

एकाग्रता कमी होणे 
 वाचन किंवा खेळणे यासारख्या क्रियांमध्ये लक्ष केंद्रित न करू शकणे. 

 समाजातील वावर कमी होणे 
 जास्त स्क्रीन टाइममुळे मौखिक संवाद कमी होत चालला आहे. मूल नेहमी फोनवर वेळ घालवू लागते आणि इतरांशी संवाद साधणे टाळते.

 स्क्रीन टाईम मर्यादित करा 
लहान मुलांसाठी दररोज एक तासाचा स्क्रीन टाइम पुरेसा आहे. बेडरूम, डायनिंग टेबल आणि कौटुंबिक वेळेत पालकांनी देखील स्क्रीनचा वापर करणे टाळा.

 मुलांसोबत शैक्षणिक खेळ खेळा
 नृत्य, संगीत, बागकाम, चित्रकला आणि मुलांसोबत कोडे सोडवणे यासारख्या क्रिया करा

 स्क्रीन वापर मर्यादित करणे गरजेचे 
स्क्रीनचा वापर कमी करणे आणि मुलांचे जीवनमान सुधारणे ही काळाची गरज असून, यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.

Click Here