ये आईना है या तू है... 

राशा थडानीचं मिरर फोटोशूट चर्चेत

राशा थडानी बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड आहे आणि नुकतेच तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.

राशा थडानीने अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून ती खूप चर्चेत आली.

राशा थडानीचा 'आझाद' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र अभिनेत्रीवर चित्रीत झालेले 'उई अम्मा..' हे गाणे खूप गाजले.

राशा थडानी आगामी प्रोजेक्टव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच राशा थडानीने आकाशी रंगाच्या वन पीसमध्ये फोटोशूट केलंय. यात तिने मिरर समोर एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

राशा थडानी या फोटोशूटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here