आरोग्यासाठी व्यसन करणे अत्यंत वाईट. वेळीच सोडा वाईट सवयी.
घरी एखाद्या व्यक्तीला जरी व्यसन असले तरी घरातील प्रत्येक व्यक्ती त्रासातून जाते. कोणत्याही प्रकारचे व्यसन असणे फार वाईट.
भारतात गावोगावी महिला व्यसनी नवरा, भाऊ, वडील असल्याने दिवसरात्र कष्टात काढतात. फक्त पुरुष नाही तर महिलाही व्यसनांच्या आहारी जातातच.
लागलेले व्यसन सोडणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. फार कठीण असते. त्यामुळे काही सवयी लावून घेणे फार फायद्याचे ठरते.
व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घेणे नक्कीच फायद्याचे ठरते. असे अनेक लोक आहेत ज्यांनी काहीच महिन्यात व्यसन सोडले आहे. रोज दारु, जुगार करणारे लोक आता त्या दिशेला जातही नाहीत.
व्यसन एकदम सोडता येत नसेल तर टप्प्या टप्प्याने प्रमाण कमी करायचे. हळूहळू बंद करायचे. मानसिक ताण येणार नाही.
ट्रिगर्स ओळखा. ज्यामुळे तुम्हाला व्यसन करावेसे वाटते त्यापासून दूर राहा. एखादी व्यक्ती जी व्यसन करणसाठी मदत करते तिच्यापासून लांब राहायचे.
संगत कायम चांगली हवी. संगतीचा परिणाम आयुष्यावर फार होतो. सकारात्मक ऊर्जा देणारी माणसे आयुष्यात राहू द्या. नकारात्मकता जवळ ठेवायचीच नाही.
रोज व्यायाम करा. भरपूर पाणी प्या. फळे खा. फिरायला जा. कुटुंबासोबत वेळ घालवा.
छंद जोपासा. त्यात मन रमले की व्यसनाचे विचारच डोक्यात येणार नाहीत. वाचन करा, संगीत ऐका. काही नवे शिका.