चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईलमुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.
अपचन, गॅस आणि ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणे या समस्या होतात. अशात औषधांचा वापर करण्याऐवजी तुम्ही नॅचरल उपाय करून या समस्या दूर करू शकता.
आज आम्ही चार अशा तेलांबाबत सांगणार आहोत, जे तुम्ही नाभिवर रोज लावले तर तुमचं पचन तंत्र मजबूत होतं.
खोबऱ्याचं तेल नाभिवर टाकणं खूप फायदेशीर मानलं जातं. याने पचन तंत्र थंड राहतं. यात आवश्यक फॅटी अॅसिड असतं जे पोटासाठी फायदेशीर असतं.
मोहरीचं तेलही पोटासंबंधी समस्यांसाठी खूप फायदेशीर असतं. हे तेल जेवण बनवण्यासाठीही वापर करू शकता. दोन थेंब तेल रोज नाभिवर टाकल्याने पचनही चांगलं होतं.
नाभिवर रोज रात्री झोपण्याआधी एक थेंब ऑलिव्ह ऑइल टाका. याने पोटात गॅस तयार होणे आणि बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होतात.
शुद्ध तूप नाभिवर लावल्याने पचन तंत्र मजबूत राहतं आणि गॅसची समस्याही दूर होते.
नाभिवर तेल किंवा तूप लावल्याने पचन तंत्र मजबूत राहतं. तसेच नाभिमध्ये तेल लावल्याने पोटाच्या मसल्सना आराम मिळतो. जळजळ आणि वेदनाही कमी होतात.