आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल
पवन कल्याण यांची पत्नी अन्ना कोनिडेला यांनी तिरुपती मंदिरात जात डोक्यावरील केस काढून मुंडन केले
मुलगा मार्क शंकर याच्या सुरक्षेसाठी आई अन्नानं नवस केला होता, तो फेडण्यासाठी त्या तिरुमला मंदिरात गेल्या.
अन्ना कोनिडेला यांचं खरे नाव अन्ना लेझनेवा आहे. त्या एक मॉडेल असून मूळच्या रशियाच्या आहेत.
अन्ना बऱ्याच साऊथ इंडियन सिनेमात नजरेस आल्यात. तिथेच एका फिल्म सेटवर पवन कल्याण यांच्याशी त्यांची भेट झाली.
या दोघांमध्ये आधी मैत्री झाली, मग हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले.
२०१३ साली पवन कल्याण यांच्यासोबत अन्नाचं लग्न झाले. पवन कल्याण यांची ती तिसरी पत्नी तर अन्नाचेही हे दुसरं लग्न आहे.
अन्ना भारतीय परंपरा, श्रद्धा मानते. त्यामुळेच मुलाच्या सुरक्षेसाठी केलेला नवस फेडण्यासाठी त्यांनी मुंडन केले.