विकतचे पदार्थ नकोच आणि पॅकेज्ड फुड तर अजिबात नको. पाहा काय परिणाम होतो.
आजकाल पॅकेज्ड फुड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. फक्त गरम पाणी ओतले की पदार्थ तयार होतो. म्हणून सोपे आणि खायला चविष्ट वाटते.
पॅकेज्ड फुड हे भरपूर प्रक्रिया केलेले असते. जास्त काळ पदार्थ टिकावा म्हणून त्यात प्रेझर्व्हेटिव्ह्ज, कृत्रिम रंग, फ्लेवर्स, स्टेबलायझर्स यांचा वापर केला जातो.
त्यात जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट्स असतात. तसेच साखर असते आणि मीठही भरपूर असते. त्यामुळे त्वचेवर पुरळ, ऍलर्जी, सूज येते.
त्यात नैसर्गिक पोषक घटक फार कमी असतात. ते दिसायला आकर्षक असतात. त्यातील मसाला आकर्षक असतो. मात्र त्यासाठी त्यात अनेक हानिकारक घटक घातले जातात.
तसेच ते दिर्घकाळ प्लास्टिकमध्ये असते. त्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते आणि पदार्थावर परिणाम होतो.
त्यामुळे कितीही पौष्टिक पदार्थ घातलेले असले तरी पॅकेज्ड फुड अजिबात खाऊ नये. लहान मुलांना तर देऊच नयेत.