जगात सगळ्यात दुर्गंधी येणाऱ्या फुलाचं नाव कॉर्प्स फ्लॉवर आहे.
याला मृतदेहासारखं फूल असंही म्हणतात. कारण यातून सडलेल्या मांसासारखी दुर्गंधी येते.
या फुलाचं वैज्ञानिक नाव एमॉरफोफालुस टायटेनम असं आहे. हे फूल इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतं आणि फारच दुर्मिळ आहे.
या फुलातून येणारा दुर्गंध कीटकांना आकर्षित करण्यासाठी असतो. या फुलाची उंची १० फुटापर्यंत असते आणि याचं वजन साधारण ७० किलो इतकं असतं.
याच कारणाने हे फूल जगातील सगळ्यात मोठ्या आकाराच्या फुलांपैकी एक आहे.
हे फूल ७ ते १० वर्षात केवळ एकदाच फुलतं आणि त्यातून साधारण २४ ते ४८ तासांपर्यंत दुर्गंधी येते.