आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार!

आयपीएलच्या इतिहासात ५० किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या कर्णधारांच्या विजयाची टक्के पाहूयात

आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये हार्दिक पांड्या अव्वल स्थानी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ६० टक्के विजय मिळवला आहे.

सचिन तेंडुलकरने ५१ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. त्यापैकी ३० सामने जिंकले. त्याच्या विजयाची टक्केवारी ५८.८२ इतकी आहे.

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या विजयाची टक्केवारी ५८.०२ इतकी आहे.

महेंद्रसिंह धोनी यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २३२ पैकी १३४ सामने जिंकले आहेत.

हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एकूण ५५.०६  टक्के सामने जिंकले आहेत.

Click Here