फटाक्यांमुळे शरीरावर होतात गंभीर दुष्परिणाम 
श्रवणशक्ती कमी होणे, फुफ्फुसांचे आजार, त्वचेची जळजळ, डोळ्यांना इजा आणि मानसिक आरोग्यावर ताण 

श्रवणशक्ती कमी होणे
 फटाक्यांच्या आवाजामुळे कानाचे पडदे खराब होऊ शकतात, ज्यामुळे ऐकू येणे कमी होते किंवा कानात सतत आवाज येत राहतो

फुफ्फुसाचे आजार
 फटाक्यांच्या धुरातील प्रदूषणामुळे अस्थमा, सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि इतर श्वसनाचे आजार बळावतात.

 डोळ्यांना इजा
 फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते, ज्यामुळे अंधत्व येण्याचा धोका असतो. 

त्वचेची जळजळ
 फटाके हाताळताना निष्काळजीपणामुळे त्वचेला गंभीर भाजण्याची शक्यता असते. 

मानसिक ताण आणि चिंता
 फटाक्यांचा मोठा आवाज मुलांना आणि वृद्धांना घाबरवतो, ज्यामुळे ताण आणि चिंता वाढते. 

 झोपेच्या समस्या 
फटाक्यांमुळे होणारा आवाज आणि प्रदूषण यामुळे झोपेवर परिणाम होतो. 

कर्करोगाचा धोका
 फटाक्यांच्या धुरामध्ये असलेल्या अनेक घातक रासायनिक घटकांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. 

हवा प्रदूषण
 फटाके फोडल्याने वातावरणातील कार्बन मोनोऑक्साइड आणि डायऑक्साइड सारख्या प्रदूषकांची पातळी वाढते, ज्यामुळे हवा प्रदूषण होते आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. 

फटाक्यांच्या प्राण्यांना त्रास
 फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव प्राणी आणि इतर वन्य प्राण्यांना मोठा त्रास होतो, ज्यामुळे ते घाबरतात आणि त्यांना पॅनीक अटॅक येऊ शकतात. 

Click Here