किडनी स्टोन असेल तर फॉलो करा 'हे' डाएट!

किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्तींनी खाण्यापिण्याचे पथ्य पाळणं अत्यंत गरजेचं आहे. 

किडनी स्टोनची समस्या असेल तर अशा व्यक्तींनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्तींनी खाण्यापिण्याचे पथ्य पाळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, अशा व्यक्तींना आहारात काय घ्यावे हे पाहुयात.

मुतखडा अर्थात किडनी स्टोन झाल्यास दिवसभरात मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. तुम्ही नारळपाणी, ऊसाचा रस, कुथळाचं कढण, ज्युस यांचंही सेवन करु शकता.

अशा व्यक्तींनी फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. यात पालेभाज्या, फळांचा समावेश असावा.

शेवग्याच्या शेंगा, कारलं, मुळा, गाजर याचं नियमितपणे सेवन करावं.

मुतखडा असलेल्या व्यक्तींनी द्राक्षे आवर्जुन खावीत. द्राक्षांमध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असतं ज्यामुळे मुतखड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

केळ खाल्ल्याने खरंच पोट साफ होतं का? 

Click Here