कियारा आडवाणीने तिच्या बेबी बंपने कॅमेरा आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
मेट गाला २०२५ ५ मे पासून सुरू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये पार पडत असलेल्या या भव्य कार्यक्रमात बॉलिवूडचा दबदबा दिसून आला. कियारा आडवाणीने तिच्या बेबी बंपने कॅमेरा आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत होती. आता ती मेट गालामध्ये पहिल्यांदा सामील झाली आहे.
जेव्हा तिने तिच्या काळ्या, पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या कॉम्बिनेशन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर प्रवेश केला तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर होत्या.
अभिनेत्रीच्या ड्रेसला 'ब्रेव्हहार्ट्स' असे नाव देण्यात आले होते, जे महिलांच्या शक्तीचे, मातृत्वाचे आणि बदलाच्या नवीन टप्प्याचे प्रतीक आहे.
कियारा म्हणाली, ''एक कलाकार आणि आई होणारी महिला म्हणून, हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.''
मॅनहॅटनमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटमध्ये रेड कार्पेटवर चालणारी कियारा आडवाणी ही चौथी भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
कियारा आडवाणीचा हा सुंदर ड्रेस आणि तिचा सुंदर लूक भारतीय डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केला आहे.
कियारा अडवाणीच्या बेबी बंप लूकची झलक पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून उत्सुक होते, आता त्यांना मेट गालामध्ये पहिल्यांदाच कियाराला या अवतारात पाहून चाहते खूश झाले आहेत.