अजूनही तुमच्याकडे बालपणीचं एखादं खेळणं असेल तर ते तुमची मदत करू शकतं.
रिसर्चनुसार, जे लोक बालपणीची खेळणी किंवा टेडी बेअर आपल्याजवळ ठेवतात, ते कमी स्ट्रेसमध्ये राहतात.
हा रिसर्च लंडन यूनिव्हर्सिटीच्या सायकॉलॉजिस्ट विभागानं केला. त्यांना आढळलं की, अशा लोकांचं मन आणि मेंदू जास्त शांत व मजबूत राहतो.
रिसर्चनुसार, बालपणीची खेळणी किंवा टेडी बेअर तेव्हाही आपल्या मनाला आराम देतात. जेव्हा आपण मोठे होतो.
या गोष्टींना सायकॉलॉजीमध्ये ट्रांझिशनल ऑब्जेक्ट म्हटलं जातं. म्हणजे जे बालपणी आपल्याला आधार देत होते.
शोधात लोकांनी सांगितलं की, जेव्हा ते तणावात असतात, तेव्हा बालपणीच्या वस्तू त्यांचं मन हलकं करतात.
असंही समोर आलं की, जे लोक त्यांच्या जुन्या वस्तू त्यांच्या जवळ ठेवतात, ते चिडल्यावर किंवा भांडताना लवकर शांत होतात.
या गोष्टी बालपण आणि आठवणींना जोडतात. यांनी आपल्याला स्वत:ला समजण्यास मदत मिळते. जुन्या आठवणी ताज्या होतात.
काही लोक विचार करतात की, बालपणीची खेळणी ठेवणं बालीशपणा आहे. पण रिसर्चनुसार ही खूप चांगली बाब आहे.