कमाईचा आकडा वाचून चॅनेल सुरू करण्याचा कराल विचार
भारतातील सर्वात श्रीमंत यूट्यूबर कोण? याची चर्चा नेहमीच होत असते. तर आज आपण भारतामधील टॉप ५ सर्वात श्रीमंत यूट्यूबर्स कोण आहेत, हे पाहूयात.
कॉमेडियन आणि कंटेंट क्रिएटर म्हणून प्रसिद्ध असलेला तन्मय भट हा भारतातील सर्वात श्रीमंत यूट्यूबरच्या यादीत अग्रस्थानी आहे.
ताज्या अहवालानुसार, तन्मय भटची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे ६६५ कोटी इतकी आहे.
केवळ यूट्यूब चॅनलवरच नव्हे, तर डिजिटल मार्केटिंग, बिझनेस व्हेंचर्स आणि ब्रँड एंडोर्समेंट्सच्या माध्यमातून तन्मय भटनं मोठी संपत्ती उभी केली आहे.
तर दुसऱ्या क्रमांकावर ३५६ कोटींचा मालक टेक्निकल गुरुजी म्हणून ओळखला जाणारा गौरव चौधरी आहे.
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि चेस स्ट्रीमर समय रैना १४० कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
कॅरीमिनाटी (अजय नागर) १३१ कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आहे.
भुवन बाम (बीबी की वाइन्स) १२२ कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे.