तुम्हीही दररोज डोळ्यांना काजळ लावता का ?

मग ही १ चूक करू नका नाही तर त्वचेवर दिसतील वाईट परिणाम...

 काजळ जरुर लावा, पण ही चूक नक्की टाळा
डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काजळ उत्तम, पण एक सवय डोळे आणि त्वचा दोन्ही खराब करू शकते.

 काजळाचा जादूई स्पर्श
काजळ लावल्याने डोळे अधिक आकर्षक दिसतात आणि चेहऱ्याला वेगळा लूक मिळतो.

 बाजारात काजळाचे अनेक प्रकार
वॉटरप्रूफ, न पसरणारे, २४ तास टिकणारे… पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य वापर.

 महिलांची हमखास होणारी चूक
दिवसभर काजळ लावून रात्री झोपताना ते न काढणे, ही सवय त्वचेसाठी हानिकारक

 काय होते या चुकीमुळे ?
काजळातील रसायने (झिंक, लोह, लीड ऑक्साईड) त्वचेत मुरून काळी वर्तुळे व त्वचेचे नुकसान करतात.

 रात्री काजळ काढणे का महत्त्वाचे ?डोळ्यांभोवतीची त्वचा अतिशय नाजूक असते. ती वाचवण्यासाठी काजळ पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे.

 क्लिंजिंग मिल्क
कॉटन पॅडवर क्लिंजिंग मिल्क घेऊन हलक्या हाताने डोळ्यांवरील काजळ काढा.

 गुलाबपाणी
गुलाबपाणी काजळाचे सूक्ष्म कण काढते आणि त्वचेला ताजेपणा देते.

 पेट्रोलियम जेली
थोडीशी जेली लावून मसाज करा व कॉटनने पुसून टाका.

 लक्षात ठेवा
काजळ तुमच्या सौंदर्यात भर घालते, पण ते वेळेवर काढणे हीच खरी सौंदर्याची गुरुकिल्ली आहे.

Click Here