कोहलीचा 'हा' विक्रम मोडणे शक्य नाही!

विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा धावा केल्या आहेत.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सलामीवीर विराट कोहलीने अर्धशतक ठोकून नव्या विक्रमाला गवसणी घातली.

कोहलीने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे.

कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ६२ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

या यादीत पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६१ वेळा अशी कामगिरी केली आहे. 

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने ५७ वेळा प्रथम फलंदाजी करताना ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टी-२० क्रिकेटमध्ये ५५ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरने ५२ वेळा अशी कामगिरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही ५२ वेळा हा पराक्रम केला.