दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२५ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पंजाब किंग्जचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर झाला आहे.
ग्लेन मॅक्सवेलच्या बोटाला दुखापत झाल्याची माहिती पंजाब किंग्जने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली.
कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना मॅक्सवेलला दुखापत झाली.
यंदाचा आयपीएल हंगाम मॅक्सवेलसाठी अत्यंत खराब ठरला.
मॅक्सवेलने सहा सामन्यात ४८ धावा केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाबने त्याला ४.२ कोटीत खरेदी केले होते.