उकडीचे मोदक बनवण्याचे साहित्य तांदळाचे पीठ - २ वाट्या, किसलेले नारळ - २ कप, गूळ - १ कप, देसी तूप - २ टीस्पून, वेलची पावडर - १/२ टीस्पून, मीठ
उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात १ चमचा देशी तूप गरम करून त्यात २ वाट्या खोबरे घालून परतून घ्या.
नारळातून सुगंध यायला लागल्यावर त्यात ठेचलेला गूळ टाका आणि नीट मिक्स करून शिजवा.
मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत आणि नारळात मिसळेपर्यंत शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर वेलची पावडर घाला. मोदकाचे सारण तयार आहे.
आता दुसरे पॅन घ्या आणि त्यात १ चमचा देशी तूप घालून मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळले की त्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि मिसळा.
आता त्यात २ कप पाणी टाकून उकळा. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करा.
आता गॅस बंद करून पीठ झाकून ५ मिनिटे बाजूला ठेवा. पीठ थोडे कोमट राहिल्यावर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा आणि नंतर पीठ मळून घ्या.
आता पिठाचे गोळे बनवा आणि एक गोळा घ्या, त्याचे गोल करा आणि नंतर ते चपटे करा. यानंतर, दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी हलके दाबा.
कपाचा आकार येईपर्यंत पीठाचे कोपरे हळू हळू दाबत रहा. मग त्यातून प्लीट्स बनवा. यानंतर मोदकात तयार गूळ-खोबऱ्याचे सारण भरा त्याला आकार द्या.
अशाप्रकारे सगळे मोदक बनवून घ्या आणि त्यांना नंतर १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या. चविष्ट उकडीचे मोदक तयार आहेत.