कधी कधी आपली ऑफिसमध्ये खूप चिडचिड होते, आपल्या कलिगचा, बॉसचा खूप राग येतो. तो कंट्रोल करता यायलाच हवा.
नाहीतरी करिअरमध्ये तो मोठा अडसर ठरू शकतो. तुमच्या कित्येक संधी हातातून जाऊ शकतात.
म्हणूनच राग कंट्रोल करण्यासाठी या काही गोष्टी करा. कितीही राग आला तरी आपला फाेकस ढळू देऊ नका.
खूप राग आल्यावर बोलायला जाऊ नका. रागात एखादा शब्द जास्तच बोलला जातो. त्यामुळे शक्यतो शांत बसा.
१ ग्लासभर पाणी प्या किंवा मग चहा- कॉफी घ्यायला जा. राग थोडा शांत होईल.
जेवढं काम तुम्हाला झेपतं तेवढंच करा. नाही म्हणायला शिका. कधीकधी काम जास्त झाल्यावर त्याचा ताण वाढतो आणि चिडचिड होते.
राग आला तर तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी त्याविषयी चर्चा करा. मनातली खळबळ, राग कमी होऊन मन शांत होईल.