पावसाळ्यात केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. ज्या त्रासदायक असतात.
पावसाळ्यात जास्तीत जास्त लोकांना केसगळतीची समस्या होते. त्यामुळे किती वेळा केस धुवावे महत्वाचं ठरतं.
त्यामुळे केस पावसाच्या दिवसात किती वेळा धुवायला हवे? असा प्रश्न अनेकांना पडतो.
जर आपले केस जास्तच ऑयली असतील तर पावसाच्या दिवसांमध्ये दर दोन दिवसांनी केस धुवायला हवेत.
जर आपले केस जास्तच ड्राय असतील तर पावसाच्या दिवसात आठवड्यातून दोनदा धुतले तरी पुरेसं आहे.
जर केस चांगले आहेत, नॉर्मल आहेत तर तीन दिवसातून एकदा धुवायला हरकत नाही.
पावसाच्या पाण्यात केस भिजले असतील तर ते धुवून चांगले कोरडे करा. नाही तर केसांचा वास येऊ शकतो.