केवळ लिंबूच नाही तर लिंबाच्या सालीचेही आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पाहुया काय...
बरेच लोक लिंबाचा वापर केल्यावर त्याची साल कचरा समजून फेकून देतात. पण याचे अनेक फायदे लोकांना माहीत नसतात.
लिंबाच्या सालीमध्ये व्हिटामिन सी आणि व्हिटामिन ए असतं. यानी इम्यूनिटी बूस्ट होते आणि शरीराचा आजार व इन्फेक्शनपासून बचाव होतो.
लिंबाच्या सालीमध्ये फ्लेवोनोइड्स, डी-लिमोनेन आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे फ्री रॅडिकल्ससोबत लढतात आणि एजिंग प्रोसेस स्लो करतात.
लिंबाच्या सालीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ही साल तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली असते.
लिंबाच्या सालीमध्ये फायबर असतं, ज्यामुळे डायजेशनमध्ये मदत मिळते. तसेच बद्धकोष्ठताही दूर होते.
लिंबाच्या सालीमध्ये व्हिटामिन सी आणि सायट्रिक अॅसिड असतं. ज्यानं त्वचा चमकदार होते आणि पिंपल्सही दूर होतात.
या सालीमधील पॉलीफेनॉल फॅट बर्न करतं आणि यानं वजन कंट्रोल करण्यास मदत मिळते.