वेलचीनं केवळ टेस्ट वाढते असं नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
रोज सकाळी जर तुम्ही दोन वेलची चावून खाल्ल्या आणि वरून पाणी प्यायले तर अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात.
हिरव्या वेलचीमध्ये व्हिटामिन सी, बी६, रायबोफ्लेविन, नायसिन असे व्हिटामिन आणि खनिज असतात.
वेलचीमध्ये शक्तीशाली अॅंटी-ऑक्सीडेंट्स असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात. वेलचीमधील डायटरी फायबरमुळे पचन तंत्र मजबूत आणि फिट राहतं.
यातील फ्लेवोनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सनं शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. फ्री रॅडिकल्समुळे शरीराचं वय वेगानं वाढतं आणि गंभीर आजारांसाठी कारणीभूतही ठरतात.
रोज जर वेलची खाल तर शरीरातील रक्त शुद्ध होतं आणि ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं.
पाण्यात दोन ते तीन वेलची उकडा. जेव्हा पाणी अर्ध राहील तेव्हा प्या आणि वेलची चावून खा. सकाळी उपाशीपोटी याचा जास्त फायदा मिळेल.