नाकातील केस हे विनाकारण नसतात. ते आपल्याच सुरक्षेसाठी असतात.
बरेच लोक नाकातील केसही खेचून काढतात किंवा कापतात. नाकातील केस खेचून काढणं फारच घातक असतं.
नाकातून केस खेचून काढल्यानं मेंदुला रक्त पुरवणाऱ्या नसांचं नुकसान होतं. ज्यामुळे स्थिती गंभीर होऊ शकते.
नाकातील केस आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फार महत्वाचे असतात. हे श्वास घेताना सगळ्या गोष्टी फिल्टर करून आत पाठवतात.
नाकातील केस काढल्याने इन्फेक्शनचा धोका होतो. नाकातील केस काढल्यास फॉलिकल्सजवळचे कीटाणू आणि कण फिल्टर न होताच आत जातात.
नाकातील केस कापल्याने किंवा वॅक्स केल्याने रोमछिद्रे बॅक्टेरिया आणि इतर कीटाणूंच्या संपर्कात येतात. हे बॅक्टेरिया मेंदुपर्यंत पोहोचू शकतात.
नाकातील केस काढणं म्हणजे अॅलर्जी होणे. अस्थमा असलेले लोकही अॅलर्जीने ग्रस्त होऊ शकतात. अनेक आजारांचा धोका अधिक वाढतो.
जर तुमच्या नाकातील केस वाढले असतील, वळवळत असतील, खेचून काढण्याऐवजी ट्रिम करा. याने जास्त नुकसानही होणार नाही.