पितृपक्ष हा काळ पावसाळा संपण्याचा आणि हिवाळा सुरू होण्याचा असतो या काळात पोषण आणि शक्तिवर्धनाची आपल्या शरीरात सुरुवात होते
पित्रातील हे पदार्थ आहारात नेहमीच गरजेचे आमसुलाचे चटणी, फळभाज्या - पालेभाज्या, कारल्याची भाजी, उडदाचे वडे, तांदळाची खीर, कढी- दही भात
आमसुलाची चटणी आमसुल पित्तावर नियंत्रण करायला मदत करतं. आमसुलात क जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनिज यासारखे जीवनसत्त्व आणि खनिजे मुबलक असतात
फळभाज्या आणि पालेभाज्या गवार, भोपळा आणि कारले या पालेभाज्या या कालावधीत मुबलक मिळतात. या आहारासाठी उत्तम असतात
गवार भाजी मधुमेह आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवायला गवार भाजीची मदत होते
भोपळा भाजी भोपळ्यात ‘अ’ जीवनसत्त्व, फॉस्फरस, कॅल्शियम आणि ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे ती अतिशय पौष्टिक, आरोग्यदायी असते.
कारल्याची भाजी मधुमेह, कावीळ, अनिमिया अशा आजारांवर ही भाजी उपयुक्त आहे. या भाजीचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहते
पालेभाजी पितृपक्षात मेथी, पालक या पालेभाज्या केल्या जातात, पचन सुधारण्यास आणि पोटाचे आजार दूर होण्यास त्यांची मदत होते
उडदाचे वडे उडादाच्या डाळीच्या वडय़ांमध्ये तांदळाचाही समावेश असतो त्यामुळे कार्बोदक आणि प्रथिनांचे प्रमाण योग्य शरीराला मिळते.
तांदळाची खीर भात, दूध एकत्र असल्यामुळे शरीराला कार्बोदके आणि प्रथिने यांचं प्रमाण जेवढे योग्य असेल तेवढे मिळतात. दूध असल्यामुळे कॅल्शियम आणि स्निग्ध पदार्थही शरीराला मिळतात.
कढी- दही भात कढी आणि दही भात खाल्ल्याने पचन सुधारते, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.