वजन वाढणं आणि किडनीच्या आजाराचा काय संबंध? समजून घेऊ.
व्यक्तीला ३ ते ४ किलो वजन वाढणं कॉमन वाटतं. त्यांना वाटतं की, लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यात बदल झाल्यानं असं झालं असेल.
पण तुम्हाला हे माहीत नसेल की, शरीरातील बदल आपल्या किडनीवर प्रभाव टाकतो. काही रिसर्चमध्ये हलकं वजन वाढणे आणि किडनीसंबंधी आजारात संबंध आढळून आलाय.
अनेकदा असं मानलं जातं की, लठ्ठपणाचा किडनीवर प्रभाव पडतो. तसंच हलकं वजन वाढणं किडनीसंबंधी आजाराचं लक्षण असू शकतं.
शरीरातील वेस्ट बाहेर काढणं आणि फ्लूइड संतुलिन ठेवणं किडनीचं काम आहे. पण जेव्हा वजन वाढतं तेव्हा किडनी जास्त ब्लड फिल्टर करावं लागतं.
त्यामुळे किडनीवर कामाचा जास्त दबाव पडतो. या स्थितीला हायपरफिल्ट्रेशन म्हटलं जातं. यापासून बचाव करण्यासाठी रोज सकाळी लिंबू पाणी प्यावे. यानं किडनी डिटॉक्स होते.
नाश्ता करण्याआधी सकाळी एकतर वॉक करा किंवा स्ट्रेच करा. यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि आतड्यांमध्ये फॅट जमा होत नाही.
लंच छोट्या छोट्या भागात करा. असं करून तुम्ही ओव्हरईटिंग टाळाल, ज्याद्वारे रोज १५ ते २० टक्के कमी कॅलरी घ्याल.
त्यासोबतच आहारातील मिठाच्या प्रमाणावर लक्ष द्या. जास्त मीठ खाल तर किडनीत समस्या होऊ शकते.