शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खा हे पदार्थ. पाहा किती फायद्याचे ठरेल .
शरीरासाठी गरजेच्या असलेल्या अनेक सत्वांपैकी अत्यंत महत्त्वाचे एक म्हणजे लोह. लोहाचे प्रमाण कमी झाल्यास अनेक त्रास होतात.
थकवा येतो, दम लागतो, चक्कर येते, तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे काही लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असणे गरजेचे असते.
पालकाच्या पाल्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. तसेच पालकामुळे इतरही अनेक गुणधर्म शरीराला मिळतात. त्यामुळे पालकाचे पदार्थ आहारात असावेत.
विविध कडधान्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. मटकी तसेच मूग आणि हरभरा अशी इतर कडधान्ये रोजच्या जेवणात असायला हवीत.
राजगिरा हा पदार्थ उपासाला खाल्ला जातो. राजगिर्याचे लाडू तसेच इतरही काही पदार्थ मिळतात. राजगिरा खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.
घरी तीळ असतात. मात्र त्याचा वापर आहारात फारसा केला जात नाही. तीळ खाणे हा लोह मिळवण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पदार्थांमध्ये तीळ घालावेत.
ज्वारी, बाजरी हे पदार्थ आरोग्यासाठी फार फायद्याचे असतात. भाकरी असो वा इतर एखादा पदार्थ आहारात असावा. लोह भरपूर मिळते.
शेंगदाणे तर आपण आवर्जून खातोच. मात्र शेंगदाणे खाल्याने फक्त पित्ताचा त्रास होत नाही तर योग्य प्रमाणात खाल्यामुळे लोहही मिळते.