ब्रश केल्यावर लगेच चहा पिणं घातक, कारण

अनेकांना ब्रश केल्यावर लगेच चहा हवा असतो. पण असं करणं चुकीचं ठरतं.

ब्रश केल्यावर तोंडातील पीएच बॅलन्स थोडं अल्कलाइन होतं. लगेच चहा प्याल तर त्यात अ‍ॅसिड मिक्स होतं, ज्यामुळे दातांचं नुकसान होतं.

टूथपेस्टमधील फ्लोराइड दात मजबूत करतं. पण ब्रश केल्यावर लगेच चहा पित असाल तर फ्लोराइडचा थर लगेच निघतो.

काही रिसर्चनुसार, दात पुन्हा पुन्हा अॅसिडच्या संपर्कात आल्यानं दातांवरील थर कमजोर होतो. ब्रशनंतर चहा पिणं हे याचं एक कारण आहे.

ब्रश केल्यावर दात जरा सेन्सिटिव्ह होतात. अशात लगेच चहा प्यायल्यास त्यातील दातांवर चिकटतात. दात पिवळे होतात.

चहामध्ये थोडं अॅसिड असतं. ब्रश केल्यावर दातांवरील थर जरा घासला जातो. अशात चहा प्याल तर हा थर आणखी जास्त कमजोर होतो.

ब्रश केल्यावर काही वेळ तोंडात टूथपेस्टची चव राहते. अशात लगेच चहा प्याल तर चहाची टेस्टही बिघडते.

एकतर चहा पिऊन थोडं थांबून ब्रश करा किंवा ब्रश केल्यावर साधारण ३० मिनिटांनी चहा प्या. नंतर पाण्यानं गुरळा करा.

Click Here