मुलं शाळेत जाताना रडतात-घाबरतात? या '१०' गोष्टी करा
नियम बनवा खेळताना किंवा अभ्यास करताना मुलांसाठी नियम सेट करा.
खाणं रुचकर करा, पर्याय द्या! मुलांना काय खायला आवडेल? असा प्रश्न त्यांना विचारा, जंक फूडऐवजी हेल्दी फूड देण्यावर भर द्या.
सकारात्मक दृष्टिकोन चुकांना पाठीशी न घालता चांगल्या वर्तनाकडे दुर्लक्ष करु नका. जेव्हा ते चांगले वागतात तेव्हा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप जरुर मारा.
मुलांचे ऐका पालकांनी मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. जेव्हा तुम्ही मुलांशी भावनिकरित्या जोडले जाल, तेव्हा मुलं तुमचं अधिक ऐकतील.
धीर धरा मुलं त्यांच्या पालकांकडे पाहून सगळं शिकतात. सर्व गोष्टी संयमाने हाताळल्या तर मुले देखील तेच अनुकरण करुन शिकतील.
स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा मोबाईल-टीव्हीचा वेळ ठरवा – आणि शैक्षणिक कंटेंट दाखवा.
खेळ आणि शारीरिक हालचाल दररोज खेळायला पाठवा, त्यांच्या आवडीचे खेळ खेळल्याने शारीरिक हालचाल होते आणि मन प्रसन्न राहते.
गोष्टी सांगण्याची सवय लावा रोज झोपताना गोष्ट सांगा, मुलांशी गप्पा मारा त्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढते आणि नातं मजबूत होते.