मराठमोळ्या अभिनेत्रीचा हटके लूक

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.

दीप्तीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झालं होतं. 

या सिनेमासाठी दीप्तीची निवड ९६ मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.

दीप्ती तिच्या आगामी प्रोजेक्टव्यतिरिक्त ग्लॅमरस आणि हटके फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने हटके फोटोशूट केलंय.

या फोटोशूटमध्ये दीप्तीने हटके पोझही दिल्या आहेत. तिचे हे फोटोशूट चर्चेत आलंय.

मुंबईत जन्मलेल्या दीप्तीने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. दीप्तीने २०१४ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत तिने 'फेमिना मिस आयर्न मेडेन'चा किताब पटकावला.

दीप्तीने भरतनाट्यम आणि कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे. २०१५ मध्ये, दीप्तीने 'नी-ना' या मल्याळम चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Click Here