बिस्किटांसारखे खुसखुशीत असे तळणीचे मोदक 
गणेशोत्सव, चतुर्थी व इतर सणालाही आवर्जून केले जातात 

साहित्य कणीकसाठी
गव्हाचे पीठ, बारीक रवा, तूप, मीठ, आणि गरजेनुसार पाणी

सारणासाठी
किसलेले सुके खोबरे, रवा, खसखस, बारीक चिरलेला सुकामेवा, पिठीसाखर, आणि वेलची पावडर.

कृती 
 कणकेचा गोळा तयार करणे:एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, तूप, आणि मीठ एकत्र करा. हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. 

सारण तयार करणे
कढईत थोडे तूप घालून खसखस व रवा भाजून घ्या. नंतर त्यात किसलेले सुके खोबरे व सुकामेवा घालून परत भाजा. 

मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर आणि वेलची पावडर मिसळून घ्या. 

मोदक बनवणे
कणकेचे छोटे गोळे करून त्याच्या लहान पोळ्या लाटा. प्रत्येक पोळीच्या मध्यभागी तयार केलेले सारण भरा आणि मग मोदकाचा आकार द्या.

खुसखशीत तळणीचे मोदक तयार 
 हे मोदक १० दिवस टिकतात आणि विविध कारणांसाठी वापरले जातात, जसे की गणेशोत्सव किंवा इतर सण. 

Click Here