दूध पिताना करू नका 'या' चुका!

दूध पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. पण काही चुका टाळल्या पाहिजे.

दूध आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरतं. यातून शरीराला कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटामिन डी आणि मिनरल्स मिळतात.

पण जर दूध तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्याल तर याचे फायदे मिळण्याऐवजी नुकसानच होऊ शकतात.

सकाळी झोपेतून उठल्यावर दूध पिण्याची सवय असते. पण उपाशीपोटी दूध प्यायल्यानं गॅस, ब्लोटिंग, अॅसिडिटी होऊ शकते.

रात्री उशीरा म्हणजे झोपायच्या लगेच आधी दूध प्यायल्यानं झोपण्यास समस्या किंवा अॅसिडिटी होऊ शकते जोपण्याच्या १ तास आधी दूध प्यावं.

जेवणानंतर लगेच दूध प्यायल्यानं डायजेशन बिघडू शकतं आणि अॅसिडिटीची समस्या होते.

दूध पुन्हा पुन्हा उकडल्यानं यातील पोषक तत्व कमी होतात. त्यामुळे दूध एकदा उकडा आणि लगेच प्या किंवा ते थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा.

थंड दूध प्यायल्यास शरीराची पचन शक्ती स्लो होऊ शकते. दूध कधीही हलकं कोमटच प्यावं.

काही लोक दुधात खूप साखर टाकतात. पण यानं वजन वाढू शकतं. दुधात साखरेऐवजी मध टाकू शकता. 

Click Here