पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये अतिक्रमण, चुकीचे पार्किंग आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न
अतिक्रमणामुळे रस्तेच नाहीसेफुटपाथवर दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, हातगाड्या आणि बिनधास्त ठिय्या गाठलेली विक्री यामुळे रस्ते ओळखूही येत नाहीत.
नो पार्किंग, नियम तोडणारे वाहनचालकचुकीच्या दिशेने जाणारे वाहनचालक, नो-पार्किंगमध्ये उभ्या दुचाकी, सिग्नलची पाळत नाहीत – ही सद्यस्थिती.
वाहनतळ नाही, त्यामुळे रस्त्यावरच पार्किंगपेठांमध्ये सार्वजनिक पार्किंगचा अभाव असल्याने दुकानदार आणि ग्राहकांनी रस्त्यांवरच वाहनं उभी केली आहेत.
वाहतूक पोलिसांचा अपुरा बंदोबस्तवाहतूक पोलीस केवळ व्यस्त चौकांमध्येच दिसतात. गल्लीबोळात त्यांची अनुपस्थिती ही वाहतूक गोंधळाचे मुख्य कारण.
पेठांतील नागरिक आणि दुकानदारांचे मत"गर्दी वाढलीय, वाहतूक सुरळीत नाही. दिवसागणिक त्रास सहन करावा लागतो.", स्थानिक नागरिकांचे मत.
वाहनचालकांचीही अडचणवाहन चालवताना अडथळे, चुकीची पार्किंग, अचानक वळणं यामुळे वाहनचालकही त्रस्त आहेत.
वाहतूक विभाग काय म्हणतो?"आम्ही वेळोवेळी अतिक्रमणविरोधी कारवाई करतो, पण स्थानिक नागरिक आणि दुकानदारांचे सहकार्य हवे."
उपाययोजना काय हव्यात?- वाहनतळाची निर्मिती- नियमित अतिक्रमण हटाव मोहिमा- स्मार्ट ट्राफिक सिस्टीम- नागरिकांचे सहकार्य