लग्नापूर्वी आई झालेल्या ८ अभिनेत्री, प्रेमासाठी त्यांनी...
बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी परंपरागत नियमांना न जुमानता लग्नाआधीच मातृत्वाचा स्वीकार केला.
अभिनेत्रींच्या या धाडसी निर्णयामुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा संदेश दिला.
लग्नाआधी आई झालेल्या अशा काही बॉलिवूड अभिनेत्री कोण ते पाहा...
रणबीर कपूरसोबत एप्रिल २०२२ मध्ये लग्न झाल्यानंतर लगेचच नोव्हेंबरमध्ये मुलगी राहाचा जन्म झाला. आलियाने गर्भधारणा लग्नाआधीच झाल्याचं स्पष्ट केलं होतं.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी २०१८ मध्ये लग्न केलं आणि काही महिन्यांतच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने नंतर कबूल केलं की लग्नाआधीच ती प्रेग्नंट होती.
मलायका अरोराची बहीण अमृता हिने २००९ मध्ये लग्न केलं आणि काही महिन्यांतच पहिल्या बाळाचा जन्म झाला, ज्यामुळे तिच्या प्रेग्नंसीवर चर्चा रंगल्या होत्या.
कोंकणा सेन आणि रणवीर शौरी यांनी २०१० मध्ये लग्न केलं आणि काही महिन्यांतच मुलगा हारूनचा जन्म झाला, ज्यावरून ती लग्नाआधी गर्भवती असल्याची चर्चा झाली होती.
१९८९ मध्ये क्रिकेटर विवियन रिचर्ड्स सोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना गुप्ता यांनी मुलगी मसाबाला जन्म दिला होता.
सप्टेंबर २०१९ मध्ये, कल्की कोचलीन हिने सोशल मिडीयावरुन माहिती देत लग्नाआधीच ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.
श्रीदेवी प्रेग्नन्ट झाल्यावर बोनी कपूर यांनी पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिला आणि श्रीदेवीशी लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यांतच श्रीदेवी जाह्नवीची आई झाली.
सेलिना जेटली देखील लग्नाआधीच प्रेग्नंट होती. तिने २०१२ मध्ये बॉयफ्रेंड पीटर हॉगसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर काही महिन्यांतच तिने विराज आणि विंस्टन या जुळ्या मुलांना जन्म दिला.