रोज सकाळी ओव्याचं पाणी पिण्याचे फायदे

ओव्याचं पाणी हे आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं.

ओव्याच्या पाण्यानं पचन तंत्र मजबूत राहतं. गॅस, अ‍ॅसिडिटी आणि ब्लोटिंगसारख्या समस्या लगेच दूर होतात.

ओव्याच्या पाण्यानं पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. ज्यामुळे पोटात मुरडा येणे किंवा वेदना होणे या समस्या दूर होतात.

ओव्यातील थायमोल आणि कार्विकल इन कार्मिनेटिव्ह गुणांमुळे गॅस तयार होत नाही आणि झालाच तर बाहेर काढण्यास मदत मिळते.

तसेच यात अ‍ॅंटी-मायक्रोबिअल गुणही असतात, जे नुकसानकारक बॅक्टेरिया रोखतात, ज्यामुळे डायरिया आणि पचनासंबंधी समस्या होतात होतात.

मसालेदार किंवा तेलकट काही खाल्ल्यावर पोटात होणारी जळजळ ओव्याच्या पाण्यानं बंद होते.

एका दिवसात एक ते दोन ग्लास ओव्याचं पाणी पिऊ शकता. यानं तोंड कोरडं पडणं, कडवटपणा आणि अल्सरही दूर होतो.

एक चमचा ओवा रात्रीभर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून कोमट करून प्या. त्यात काळं मीठ आणि लिंबू टाका.

Click Here