भुट्टा खाताना घ्या 'ही' काळजी, नाही तर 

पावसाळ्यात गरमागरम भुट्टा खाण्याची मजा काही औरच असते. पण काही गोष्टींची काळजी घ्यावी.

भुट्टे केवळ टेस्टी नसतात त्यातून अनेक फायदे मिळतात. यात फायबर, व्हिटामिन, खनिज आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स असतात.

पावसात भुट्टा खाण्याचा आनंद घ्याच, पण सोबतच खाताना काही गोष्टींची काळजी घ्या. नाही तर पोट बिघडू शकतं.

ज्या ठिकाणी भुट्टा खात आहात तेथील स्वच्छता बघा. त्यात कीटक, अळ्या नाहीत हेही चेक करा. 

भुट्ट्याची चव मोहिनी घालणारी असते. पण दोनपेक्षा जास्त भुट्टे खाऊ नका. असं कराल तर अपचन होईल. पोट दुखेल.

जर कुणाचं पोट आधीच बिघडलं असेल, लूज मोशन असेल ततर त्यांनी भुट्टा खाणं टाळावे. पोटाची समस्या आणखी वाढू शकते.

भुट्टा चांगला भाजलेला असावा, तर खा. जर तो अर्धा भाजला असेल तर त्यामुळे पचन प्रभावित होऊ शकतं.

भुट्ट्यांवर लावलं जाणारं मीठ, लिंबू आणि तिखट चांगलं आहे की नाही हेही चेक करा. नाही तर पोट बिघडू शकेल.

Click Here