इअरफोनचा अतिवापर टाळा! अन्यथा येईल कायमचा बहिरेपणा
ऐकण्याची क्षमता कमी होण्यापासून ते कायमचे बहिरेपण येण्यापर्यंतचे गंभीर परिणाम होऊ शकतात
ऐकण्याची क्षमता कमी होणे जास्त आवाजात दीर्घकाळ संगीत ऐकल्याने कानाच्या आतील नसा आणि पेशींचे नुकसान होते, ज्यामुळे ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी होते. कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका असतो.
टीनीटस आणि कानात वेदना सतत हेडफोन वापरल्यामुळे कानात सतत शिट्टी वाजल्यासारखा किंवा गुणगुणल्यासारखा आवाज येऊ शकतो. तसेच कानात वेदना, खाज सुटणे किंवा जळजळ होणे असे प्रकार घडू शकतात.
कानात इन्फेक्शन इअरफोनमुळे कानात हवा जात नाही आणि उष्णता निर्माण होते, ज्यामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊन संसर्गाचा (Infection) धोका वाढतो.
मेंदू आणि झोपेवर परिणाम रात्री झोपताना इअरफोन लावून झोपल्याने मेंदू सतत कार्यशील राहतो, ज्यामुळे शांत झोप लागत नाही, शरीराचे घड्याळ बिघडते आणि मानसिक ताण वाढू शकतो.
चक्कर येणे इअरफोनचा अतिवापर कानाच्या आतील भागावर परिणाम करतो, जो शरीराचा तोल सांभाळण्याचे काम करतो. यामुळे चक्कर येणे किंवा तोल जाणे असे प्रकार घडू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, हेडफोन वापरताना ६०/६० चा नियम पाळावा. याचा अर्थ असा की, ६०% पेक्षा जास्त आवाज न ठेवता जास्तीत जास्त ६० मिनिटेच हेडफोनचा वापर करावा, त्यानंतर कानांना विश्रांती द्यावी.