दिवाळीत करा ७ प्रकारचे रायते, चविष्ट आणि पौष्टिक

भातासोबत रायता तर हवाच. पाहा चविष्ट आणि पौष्टिक रायत्याचे प्रकार. नक्की करुन पाहा. 

भातासोबत रायता फार मस्त लागतो. मसाले भात, पुलाव, बिर्याणी कोणत्याही प्रकारचा भात असो सोबत रायता हवाच. 

रायत्यातही अनेक प्रकार असतात. त्यापैकी काही भतासोबत अगदी मस्त लागतात. पाहा कोणते प्रकार आहेत. 

बुंदी रायता तसा फार लोकप्रिय आहे. करायला अगदी सोपा आहे. तसेच त्यात दही, तिखट, मीठ एवढेच पदार्थ वापरायचे. 

पुदिना रायता बिर्याणीसोबत एकदम मस्त लागतो. त्यात काकडीचे तुकडेही घालायचे. 

कांदा - टोमॅटो रायता कोणत्याही प्रकारच्या भातासोबत छान लागतो. दही मस्त फेटून घ्यायचे. 

कोथिंबीर आणि कच्चा कोबी किसायचा, त्यात दही घालून त्यात मसाले घाला. फोडणी द्या. चवीला मस्त लागतो. 

बीटाचा रायता दिसायलाही फार सुंदर असते. बीट उकडून करायचा, चव आणि पोषण दोन्ही मिळते. 

डाळिंब्याचे दाणे घालून केलेला आंबट-गोड-तिखट असा रायता पुलावासोबत मस्त लागतो. नक्की करा.

Click Here