ज्या लोकांच्या शरीरात हिमाेग्लोबिन कमी असते, त्यांच्यासाठी हे लोहयुक्त पदार्थ खाणे खूप उपयुक्त ठरते.
रोज १ चमचा भोपळ्याच्या बिया नियमितपणे खाल्ल्याने लोह वाढण्यास मदत होते.
पालक हा लोहाचा एक चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे भाजी, सूप या माध्यमातून पालक खायला हवे.
जेवण झाल्यानंतर गुळाचा एक खडा तोंडात टाकल्यानेही शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते..
बीटमध्येही लोह असते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही बीटरुट उपयुक्त ठरते.
मेथीची भाजी किंवा मेथी दाणे यांच्यातून लोह तसेच फायबर हे दोन्हीही भरपूर प्रमाणात मिळते.
मसूर डाळ हा सुद्धा लोह आणि प्रोटीन्सचा एक चांगला स्त्रोत मानला जातो.
सुकामेव्यामधूनही शरीरातील लोहाची कमतरता भरून निघू शकते.