आजार पसरविणाऱ्या 'या' वस्तू बाथरुममध्ये मुळीच ठेवू नका..
आजार पसरविणाऱ्या या वस्तू बहुतांश घरांच्या बाथरुममध्ये असतातच.. म्हणूनच त्या वस्तू पाहा आणि तुमच्या बाथरुममधून लगेचच बाहेर काढा..
पहिली वस्तू म्हणजे पीव्हीसी शॉवर कर्टन्स. जेव्हा ते बाथरुममधल्या उष्णतेमुळे गरम होतात तेव्हा त्यांच्यातून अनेक विषारी केमिकल्स बाहेर पडतात..
लूफा देखील जास्त जुना झाला असेल तर तो टाकून द्या. एक लुफा जास्तीतजास्त ३ ते ४ महिने वापरावा.
ॲण्टीबॅक्टेरियल सोप वापरणेही चांगले नाही. त्यातून निघणाऱ्या केमिकल्सचाही शरीरावर वाईट परिणाम होत जातो.
बाथरुममध्ये रूम फ्रेशनर मारल्यामुळे त्यातून जे केमिकल्स निघतात त्यामुळे श्वसन संस्थेचे आजार जडू शकतात..
गंजलेले रेझर, ब्लेड बाथरुममध्ये ठेवू नका. त्यांच्यावर कित्येक बॅक्टेरिया जमा होतात आणि त्याच्या वापरामुळे त्वचेचे विकार होऊ शकतात.
३ ते ४ महिन्यांपेक्षा जुना झालेला टुथब्रश वापरणं बंद करा. कारण त्यावर असे अनेक बॅक्टेरिया असतात ज्यामुळे तोंडाचे वेगवेगळे विकार होऊ शकतात. .
जुने झालेले शॉवर हेड वारंवार बदलायला हवे. त्यांच्यामध्येही बॅक्टेरिया जमा होतात आणि आंघोळीच्या पाण्यासोबत ते तुमच्या शरीराच्या संपर्कात येऊन वेगवेगळे आजार होऊ शकतात. .