या सवयी बदलणे ठरेल फायद्याचे. आरोग्यासाठी चांगल्या नाहीत या ७ सवयी प्रत्येकालाच असतात मात्र बदल आवश्यक
काही सवयी टाळणे फार गरजेचे असते. अगदी साध्या रोजच्या सवयी आहेत मात्र आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.
एका ताटात जेवल्याने प्रेम वाढते आणि पोटातील जंतही. त्यामुळे उष्टे खाणे टाळा.
खोकताना तोंड न झाकता खोकणे ही फार वाईट सवय आहे. इतरांनाही आपल्यामुळे इन्फेक्शन होते. तोंडावर रुमाल धरावा किंवा तोंड झाकावे.
शिंका येत असेल तर नाक दाबून ती थांबवू नका. शिंकणे नैसर्गिक आहे त्यामध्ये लाज वाटण्याची गरज नाही.
महिनोंमहिने एकच ब्रश वापरणे चांगले नाही. वेळोवेळी नवा ब्रश आणावा.
घाम आल्यावर तो हाताने पुसण्याची सवय अनेकांना असते. तसे न करता रुमाल वापरणे योग्य आहे.
एकाच कंगव्याने घरातील सगळे केस विंचरतात केस अशाने खराब होतात. प्रत्येकाचा कंगवा वेगळा असावा.