२५ हजारांपेक्षा कमी किंमतीत ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी...
रिअलमी जीटी 5G: या फोनमध्ये ग्राहकांना ६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो, याची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे.
टेकनो फँटम एक्स २ 5G: टेकनो फॅंटम एक्स२ 5G फोनमध्ये ग्राहकांना ६४ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला.
लावा ब्लेझ कर्व्ह 5G: लावाच्या हा फोन १६ हजार ९९९ रुपयांत बाजारात उपलब्ध आहे. यात ६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो.
ओप्पो एफ २३ 5G: ओप्पो एफ २३ 5G मध्ये ६४ मेगापिक्सेलचा ट्रिपल एआय सेटअप कॅमेरा देण्यात आला.
लावा बोल्ड 5G: लावाच्या या फोनमध्ये ग्राहकांना ६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे.