साडी नेसल्यावरही कंबर दिसेल १ नंबर, ७ टिप्स

 साडी नेसल्यावर कंबर अधिक सुंदर व परफेक्ट दिसण्यासाठी खास टिप्स...

साडी नेसताना आपली उंची, आपला रंग, बांधा, शरीरयष्टी यांसारख्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागते. 

 प्रत्येक महिलेला साडीत आपली कंबर स्लिम, सुंदर दिसावी अशी इच्छा असते. यासाठी काही खास टिप्स... 

साडी नेसल्यावर कंबर स्लिम, सुंदर व शेपमध्ये दिसावी यासाठी जॉर्जेट, शिफॉन, ऑर्गेंझा यांसारख्या लाइटवेट फॅब्रिक्सच्या साड्यांची निवड करावी. 

साडीत स्लिम दिसण्यासाठी नेहमी काळा, निळा, मरुन यांसारख्या डार्क रंगाच्या साड्यांची निवड करावी. 

बॉडी फिटींग पेटिकोट वापरल्यास तुमच्या कंबरेखालचा भाग बारीक दिसतो आणि साडी चापून चोपून बसते. 

मोठ्या प्रिंट असलेल्या साड्यांमुळे बॉडी अधिक भरलेली दिसते, पण लहान प्रिंट असलेल्या साड्या आपल्याला स्लिम लुक देतात. 

साडी कमरेभोवती घट्ट बांधावी. साडी घट्ट बांधल्याने ती व्यवस्थित अंगाला बसते त्यामुळे स्लिम लूक मिळू शकतो. 

साडीमध्ये स्लिम दिसण्यासाठी शॉर्ट किंवा स्लीव्हलेस ऐवजी फुल स्लीव्हज निवडा. यामुळे जाड दंड सहज झाकले जातात व स्लिम लूक दिसतो.

Click Here