ब्रेड टोस्ट करण्याच्या ६ सोप्या रेसिपी. नक्की करुन पाहा. झटपट नाश्त्यासाठी उत्तम पर्याय.
साखर , दूध आणि ब्रेड एकत्र करुन कुरकुरीत होईपर्यंत परतायचे. त्याला बटर लावायचे. गोड आणि फार चविष्ट लागतो.
चीज टोस्ट म्हणजे एकदम मस्त आणि सोपी रेसिपी. करायला जास्त कष्ट नाहीत आणि आवडत्या भाज्या वापरा हवेते मसाले वापरा.
दही, काकडी काही इतर भाज्या असे मिश्रण तयार करुन या टोस्टवर लावता येते. चवीला फार मस्त असतो.
मशरुम टोस्ट तर सध्या फार ट्रेंडींग आहे. मशरुम परतायचे सोबत कांदा आणि चीज घ्यायचे. ब्रेडला लावायचे आणि परतायचे.
टोमॅटो टोस्ट करताना परतलेले टोमॅटो चीज आणि मसाले ब्रेडला लावायचे आणि परतून घ्यायचे.
हनी टोस्ट गोड आणि चविष्ट असतो. आवडती फळेही टोस्टवर लावू शकता.