धक धक गर्ल माधुरी दीक्षित आज ५८ वर्षांची होत आहे.. पण तिचे काही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांना आजही वेडावून टाकतात.
माधुरी दीक्षितचे जे काही डान्स पुन्हा पुन्हा पाहावे वाटतात त्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर येतं 'एक, दो, तीन' हे जबरदस्त एनर्जेटिक गाणं...
'धक धक करने लगा' हे गाणं माधुरीला धक धक गर्ल म्हणून नवी ओळख देणारं ठरलं होतं.
'चोली के पिछे क्या है' या तिच्या गाण्याने ९० च्या दशकातील पिढीला अक्षरश: खिळवून ठेवलं होतं.
यानंतर 'मार डाला..' या देवदासमधल्या गाण्याने माधुरीच्या नृत्यातलं माधुर्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावून गेलं..
'डोला रे डोला' या गाण्यातला तिचा नजाकतपुर्ण डान्स तर अजूनही जबरदस्त हिट आहे...
पुकार चित्रपटातील 'के सरा सरा' या गाण्यात तर प्रभुदेवासोबत ती अशी काही जबरदस्त नाचली की अनेकांना तिचे नृत्य प्रभुदेवाच्या तोडीस तोड वाटले..